ST Bus Video Viral Sakal
महाराष्ट्र बातम्या

ST Bus Video : गतीमान सरकारची दुर्दैवी एसटी; हातात छत्री घेऊन चालकाला चालवावी लागतेय Bus

एसटी बसमध्ये पावसाचे पाणी गळत असून चक्क ड्रायव्हरलाही हातात छत्री घ्यावी लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : पावसात एसटी बस चालवताना चक्क ड्रायव्हरला हातात छत्री घेऊन बस चालवावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी छप्पर उडालेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच आगारातील बसचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा आणि समोरील काचेवरील पावसाचे पाणी वायपर हाताने फिरवत साफ करणाऱ्या एसटी ड्रायव्हरचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता एसटीची अवस्था दाखवणारा अजून एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये एसटी ड्रायव्हर एका हातात छत्री घेऊन बस चालवताना दिसत आहे.

हे व्हिडिओ समोर आल्यानंतर एसटी बसची अवस्था महाराष्ट्रासमोर आली आहे. तर या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. सरकारकडून या आगाराला नवीन एसटी बस पुरवण्यात येत नसल्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडत असल्याचं चित्र आहे.

सरकारने एसटी बसमध्ये महिलांना प्रवासात ५० टक्के सूट दिल्यानंतर एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. पण एसटीमध्ये सुधारणा व्हावी आणि नव्या बसेस सेवेत याव्यात अशी मागणी प्रवासी करत असतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर दानचोरी : आरोपींकडे लाखोंची रोकड अन् अमेरिकन डॉलर; मोजणी कक्षातून टॉयलेटमध्ये लपवत होते पैसे, तिथून...

Empire State Tower Proposal : प्रियसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

'तू शोमध्ये आलासच का?' कंगनाने घेतली राम कपूरची शाळा, लॉकअप २ चा Viral Video

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT