Horrible Video : सिंहाच्या पिंजऱ्यात उतरला अन् थेट समोरच जाऊन थांबला तरूण; थरकाप उडवणारी 'ती' 2 मिनिटे

हा दोन मिनिटांचा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.
Horrible Video
Horrible VideoSakal

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती दारू पिऊन एका उद्यानातील सिंहाच्या पिंजऱ्यात उतरल्याचं यामध्ये दिसत आहे. तर तो थेट सिंहाच्या समोरच जाऊन उभा राहिल्याने सिंहही बावरला असून हा दोन मिनिटांचा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतातीलच एका उद्यानातील आहे. एक व्यक्ती सिंहाच्या समोरच जाऊन थांबला आहे. तर प्रेक्षकांमधून लोकं मोठ्याने आरडाओरड करताना दिसत आहे. काहीजण त्याला झोपण्यास सांगत आहेत तर काहीजण त्याला खाली बसण्यास सांगत आहेत. पण सदर व्यक्ती सिंहासोबत खेळताना दिसत आहे.

Horrible Video
Crime News : 20 वर्षे काम करून साठवलेल्या 3 लाखांची फसवणूक; PSIचा महिलेला फाशी घेण्याचा अजब सल्ला

दरम्यान, सिंह त्याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे पण या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सिंहाने व्यक्तीवर हल्ला केलेला नाही. हा व्यक्ती दारू पिलेला असल्याचं प्रेक्षकांमधील लोकांकडून बोलण्यात येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

याआधी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये सिंहाच्या पिंजऱ्यात पडलेल्या एका व्यक्तीवर सिंहाने हल्ला केला होता. यामध्ये सदर व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com