Narayan Rane Press esakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane: नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...'

ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कडाडून टीका केलीय.

सकाळ डिजिटल टीम

Narayan Rane Press Conference: दसऱ्याच्या निमित्तानं शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जोरदार भाषण झाले. मात्र त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर संमिश्र पद्धतीनं उमटताना दिसत आहे. ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कडाडून टीका केलीय. राणे यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकेचा वचपा काढला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये राणे म्हणाले, आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही. देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करु नका. काही झालं तरी उद्धव ठाकरे जबाबदार असतील. थोडी तरी मर्यादा ठेवा. तुम्ही मंत्रालयात येऊ शकत नाही. वीस मिनिटे हा माणूस चालू शकत नाही. त्याला सतत डॉक्टरांचा सल्ला लागतो. अशा एकेरी शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे. या माणसानं हिंदूत्वाबद्दल काहीही बोलू नये. त्याचे बेगडी हिंदूत्व आहे. मोदींचे नाव सांगून त्यानं आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. अशा शब्दांत नारायण राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या उपचारासाठी आले, नातेवाईकांसोबत नाश्त्याला गेले; एकाच कुटुंबातल्या ८ जणांचा मृत्यू

"बापाने 30-40 हजार भरलेत, लाज वाटत नाही का ?" संकर्षणने सांगितला आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग

Vedic Horoscope : उद्या धनोदय योग! 'या' 2 राशींसाठी लाभदायक; कष्टाला मिळणार भाग्याची जोड, करिअरमध्ये बढती, धंद्यात मोठा फायदा

Latest Marathi News Live Update : अपक्ष उमेदवार जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे

Udgir News : पेट्रोल पंपावर पुरवठा बंदची कार्यवाही; अनधिकृत तेल वाटप करत असल्याच्या तक्रारीची दखल

SCROLL FOR NEXT