narayan rane uddhav thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्या जाहीर सभेत गौप्यस्फोट करण्याचा नारायण राणेंचा इशारा

"शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गाड्या घेतल्याशिवाय रस्ता चौपदरीकरणाचं काम सुरु करु दिलं नाही"

दीनानाथ परब

मुंबई: "आज शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा कोकणातल्या उद्योजकांना त्रास होत आहे. चौपदरीकरणाचं काम सुरु झालय. पण शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गाड्या घेतल्याशिवाय काम सुरु करु दिलं नाही" असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी केला.

उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळांच उद्घाटन होणार आहे. पण त्याआधीच श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. नारायण राणेंनी कार्यक्रमाच्या एकदिवस आधीच तोफ डागली आहे. "आता रेडी बंदराचं काम सुरु आहे. दरदिवशी कोणाचा माणसू जातो? एकदिवस मी हे सर्व उघड करणार. हप्तेबाजी सुरु आहे" असा आरोप त्यांनी केला.

"उद्या जाहीर सभेत गौप्यस्फोट करणार, वास्तववादी चित्र कोकणी जनतेसमोर ठेवणार, त्यांचा भांडाफोड करणार" असे नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे तब्बल १५ वर्षानंतर एकत्र एकाच मंचावर दिसणार आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले की, "ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतय, ही माझ्यादृष्टीने चांगली गोष्ट आहे. पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे" असं राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT