काय औकात आहे? चिपी विमानतळाची परवानगी मी आणली - नारायण राणे

"मी सिंधियांकडे गेलो. मला आठ दिवसात परवानगी पाहिजे असं सांगितलं. हे चकार मारुन आले, पण परवानगी नाही मिळाली"
narayan rane, uddhav Thackeray
narayan rane, uddhav Thackeraysakal media

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg airport) चिपी (chipi) येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे उद्या उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) एकत्र एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल उत्सुक्ता आहे. सध्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

"सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. विमान वाहतून उद्यापासून सुरु होणार आहे. ही आनंद देणारी बातमी आहे. पर्यटन वाढवायचं असेल, जिल्ह्याची प्रगती हवी असेल, तर विमानतळ असायला हवा. प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याकडे हा विभाग होता. त्यांच्याकडून मी विमानतळ मंजूर करुन घेतला" असे नारायण राणे म्हणाले.

"१५ ऑगस्टचा दिवस आठवतो. मी विमानतळावर गेलो होतो. त्यावेळी समोरच्या बाजूला पोलिसांनी काही लोकांना अडवलं होतं. जमीन संपादीत करु नये, म्हणून विरोध सुरु होता. विनायक राऊत त्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. मध्यंतरीच्या काळात जी सरकार आली, मुख्यमंत्री आले कोणीही विमानतळाकडे लक्ष दिलं नाही. मी विमानतळ बांधून पूर्ण केला. पाणी पुरवठा, हायवेकडून विमानतळापर्यंत चौपदरी रस्ता आणि वीज विमानतळासाठी आवश्यक होती" असे नारायण राणे म्हणाले.

narayan rane, uddhav Thackeray
मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपला लोकांनी वेडी ठरवलं - पवार

"सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी खुज्या वृत्तीचे आहेत. विमानतळ सुरु होत आहे म्हणून ते पुढे आहेत. सी वर्ल्ड प्रकल्प कोणी बंद पाडला? मी १०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले होते. पण प्रकल्प कोणी बंद पाडला? मी सिंधुदुर्गात आणलेल्या सगळ्या विकासकामांना विरोध केला आणि आता सांगतायत आम्हीच प्रकल्प आणला" अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.

narayan rane, uddhav Thackeray
PLAY-OFF च्या आधीच KKRने दिली महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

"पर्यटनाला पोषक विमानतळ सुरु होत आहे. ही अतिशय आनंद आणि समाधान देणारी बाब आहे. आम्हीच केल असं सांगतात. पण परवानगी कोणी आणली? परवानगी मी आणली. मी सिंधियांकडे गेलो. मला आठ दिवसात परवानगी पाहिजे असं सांगितलं. हे चकार मारुन आले, पण परवानगी नाही मिळाली. काय औकात आहे, कोण विचारतोय, बुद्धीचा वापर करावा लागतो कायदेयाने काम करावी लागतात" अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com