Navneet Rana News 
महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांचे वडील फरार म्हणून घोषित

खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का

सकाळ डिजिटल टीम

Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या वडीलांना शिवजी महानगर दंडाधिकारी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. (Navneet Rana father Harbhajan Singh Kundless Shivadi Court declared absconding )

जात पडताळणी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

सुप्रीम कोर्ट आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेलं प्रकरण दोन्हीही वेगवेगळे असल्याचं निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवलं आहे.

कोर्टाने आता एक महिन्याची मुदत दिली आहे, या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला आहे.

काय आहे प्रकरण?

नवनवीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT