भाजपच्या बड्या नेत्याकडून सत्यजीत तांबेंना खुली ऑफर: Satyajeet Tambe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Vikhe Patil offer Satyajeet Tambe Joining Bjp

Satyajeet Tambe : भाजपच्या बड्या नेत्याकडून सत्यजीत तांबेंना खुली ऑफर

गेल्या काही दिवसांपासून बंडखोर नेते सत्यजीत तांबे चांगलेच चर्चेत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमदेवारीचा अर्ज भरला. त्यानंतर ते भाजपच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर दिली आहे. (Radhakrishna Vikhe Patil offer Satyajeet Tambe Joining Bjp )

नाशिक पदवीधर निवडणुकिसाठी आज मतदान पार पडत आहे. सत्यजीत तांबे यांना भाजपने पाठिंबा जाहिर केला आहे. ही माहिती ज्येष्ठ नेते राधा कृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं. जे सध्या चर्चेत आहे.

T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

काय म्हणाले राधा कृष्ण विखे पाटील?

राधा कृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहे. तसेच सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यांच्या विधानानंतर भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी सुरुवात केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर सत्यजीत तांबे काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यापूर्वीही रंगली होती चर्चा

सत्यजित यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ‘ अशा चांगल्या माणसांना मोकळे ठेवू नका, नाहीतर आमचा डोळा राहतो. चांगले नेते भाजपला हवेच आहेत, ‘ अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेने जोर धरला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patil