Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : पवार कुटुंबाच्या सीबीआय चौकशीची मागणी; काय आहे कारण?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी सीबीआयमार्फत कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे पवार कुटुंबियांच्या अडचणी वाढू शकतात.

लवसा प्रकरणी जनहित याचिका करणारे मूळ याचिकाकर्ते वकील ॲड. नानासाहेब जाधव यांनी नव्याने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजित गुलाबचंद यांच्या नावाचाही या याचिकेत यांचा समावेश आहे. या याचिकेवर नियमितपणे न्यायालयासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्पाबाबत याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप काही प्रमाणात खरे असले तरीही त्यांनी त्याला आव्हान देण्यास बराच उशीर केला आहे. असे निरीक्षण नोंदवत तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने लवासा विरोधातील याचिकेवर निकाल दिला होता.

आता पुन्हा हे प्रकरण समोर आल्यामुळे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लवासा प्रकरणी पवार कुटुंबीयाच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. यावर कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात उष्णतेचा इशारा 16 ते 18 एप्रिलदरम्यान येलो अलर्ट

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT