Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "देशाच्या बाहेरील व्यक्ती PM मोदींच्या विरोधात बोलत असेल तर..."; भारत-मालदीव वादात शरद पवारांची ठोस भूमिका

सोशल मीडियावरील सुरू झालेल्या मालदीवसोबतच्या वादाला आता राजकीय वळण मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी तिथले काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Sandip Kapde

Sharad Pawar: सोशल मीडियावरील सुरू झालेल्या मालदीवसोबतच्या वादाला आता राजकीय वळण मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी तिथले काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर सोशल मीडियावर मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. दरम्यान, मालदीवच्या काही नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल अशोभनीय टिप्पणी केली. त्यामुळे भारतीय नेत्यांनी  मालदीव सरकारवर निशाणा साधला आहे.

भारत-मालदीव वादात शरद पवार यांनी देखील आपलं मत मांडलं आहे. "नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. दुसऱ्या देशातील एखादी पदाधिकारी व्यक्ती जर त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल, तर त्याला नक्कीच विरोध असेल. आपण पंतप्रधान पदाचा मान राखायला हवा. देशाच्या बाहेरील व्यक्ती जर पंतप्रधानांच्या विरोधात काही बोलत असेल तर आम्ही ते स्वीकारणार नाही" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय टीका केली म्हणून मालदीव सरकारने तीन मंत्र्यांना निलंबित केले. दुसरीकडे, सोमवारी भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावले. वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीयांनी मालदीवला भेट देण्याची योजना रद्द केली.

मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन बाजाराला धोका निर्माण झाल्याचे येथील विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. (Latest Marathi News)

मालदीवची अर्थव्यवस्था त्याच्या पर्यटन क्षेत्रावर खूप अवलंबून आहे. पर्यटन हा येथील परकीय चलन आणि सरकारी कमाईचा मुख्य स्त्रोत आहे. मालदीवच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा थेट वाटा एक चतुर्थांश आहे आणि अप्रत्यक्षपणे जीडीपीचा खूप मोठा वाटा आहे. याशिवाय पर्यटन हेही येथील थेट रोजगाराचे प्रमुख साधन आहे. मालदीवमधील लोकांच्या रोजगाराच्या संधींमध्ये पर्यटनाचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT