ncp ajit pawar sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: मविआमध्ये पुन्हा तेढ; राऊतांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर!

राऊतांनी ‘सामना’ तील अग्रलेखातून केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आणि राष्ट्रवादीत कथित बंड होण्यावर भाष्य केलं. ईडी, सीबीआयसह इतर तपास यंत्रणांच्या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत होता. पण शरद पवारांनी राजीनामा देत बंडखोरीची योजना हाणून पाडली, असं संजय राऊतांनी या अग्रलेखात म्हंटलं आहे.

राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार बोलताना म्हणाले की, 'एखादी व्यक्ती मनाला वाटेल तसं काहीही बोलत असेल तर त्यांच्या मताला महत्त्व देण्याचं काहीच कारण नाही, असं पवारांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांचं मत म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं मत, असं असू शकत नाही, असा खोचक टोलाही पवारांनी राऊत यांना लगावलाअ आहे.

राष्ट्रवादीतील कथित बंडखोरी आणि’सामना’ वृत्तपत्रातील दाव्याबद्दल प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपाबरोबर जाण्यासाठी बॅगा भरून तयार होता, असं त्यांनी (संजय राऊत) सांगितलं आहे. त्यावर शरद पवारांनी काय सांगितलं? हे तुम्ही ऐकलं का? आमच्या राष्ट्रीय नेत्याने सांगूनही कुणी त्यांच्या मनाला वाटेल तसं बोलत असेल तर त्याला महत्त्व द्यायचं काहीच कारण नाही, असं मला वाटत नाही.”

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘सामना’च्या संपादकांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्याचं मत म्हणजे संपूर्ण राज्याचं मत नसतं, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. जितक्या व्यक्ती तितकी वेगवेगळी मतं असू शकतात. त्यामुळे त्यांचं मत तसं असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचं मत तसं नाही असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT