Weather Update: 'मोचा' चक्रीवादळाचा अलर्ट; महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये वादळी पाऊस

पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळ सक्रीय
Weather Update
Weather Update

यंदा भर उन्हात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. एप्रिलनंतर आता मे महिन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळ सक्रीय होत आहे. याच पार्श्वभूमीवरहवामान विभागाने राज्यांमध्ये अलर्ट दिला आहे. वर्षातील पहिलंच चक्रीवादळ आहे. (Weather Update mocha cyclone bengali IMD gives major update maharashtra rain alert )

ओडिसा प्रशासनाकडून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार तमिळनाडू, दक्षिण आणि किनारी कर्नाटक, केरळ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update
Diesel Vehicles : डिझेलवरील वाहनांना २०२७ पर्यंत ‘ब्रेक’ लावा

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट देण्यात आला. याशिवाय ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, मध्य उत्तर प्रदेश, लक्षद्वीप, तेलंगणा, आंध्र प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सततच्या पावसामुळे आतापर्यंत तापमानाचा पारा सामान्यापेक्षा खालीच राहिला आहे. सोमवारीही दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस पडला, ज्यामुळे तापमान 20 अंश सेल्सिअसहून कमी होतं.

Weather Update
Republic TV: ट्रेडमार्क उल्लंघन!; रिपब्लिक टिव्हीचा तेलुगू चॅनेलविरोधात १०० कोटींचा दावा

वादळाला मोचा नावं कसं पडलं?

आशिया खंडातील यमन देशाने या वादळाला मोचा असे नाव दिले आहे. मोचा हे यमनमधील एका शहराचे नाव आहे. या शहराला मोखा असेही म्हणतात. हे शहर कॉफी व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. यावरुनच मोचा कॉफी प्रसिद्ध आहे.

संयुक्त राष्ट्राच्या इकोनॉमकि आणि सोशल कमिशन फॉर आशिया आणि स्पेस्फिक (ESCAP) पॅनलचे १३ देश कोणत्याही चक्रीवादळाला नाव देतात. यात भारत, बांग्लादेश, म्यांमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थाईलंड, ईरान, कतार, सऊदी अरब, संयुक्त अरब अमीरात आणि यमन या देशांचा समावेश आहे.

अल्फाबेटिकली चक्रीवादळाचे नाव सुचवले जाते. जसे बांग्लादेश असेल तर B ने चक्रीवादळाच्या नावाची सुरुवात होते. अशा प्रकारे चक्रीवादळाला नाव दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com