maharashtra politics ncp Sharad Pawar second meeting in Beed responsibility on MLA Kshirsagars ajit pawar ncp crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'मी पंतप्रधानांना सांगितलं भाजपवर विश्वास ठेवू नका...', शरद पवार यांचा गौप्यस्फोट

बाबरीप्रकरणी शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

अंकिता खाणे (Ankita Khane)

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड’ या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे.

रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला असताना, बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, या भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना दिला होता, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवारी) केला आहे.

शरद पवार म्हणाले की, तत्कालीन भाजप नेत्या विजया राजे सिंधिया यांनी तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले होते. राव यांनी त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्याविरुद्ध त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. नरसिंह राव सरकारमध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते.

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड' या पुस्तकाचे प्रकाशन करताना बाबरी मशीद विध्वंसाच्या वेळी संरक्षणमंत्री असलेले पवार म्हणाले की, त्या बैठकीला मी तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृहसचिव माधव यांच्यासमवेत उपस्थित होतो. त्या बैठकीत विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असे आश्वासन तत्कालीन पंतप्रधान राव यांना दिले होते, असा दावा पवार यांनी केला आहे.

त्या घटनेचे वर्णन शरद पवारांनी असे केले, "मंत्र्यांचा एक गट होता. त्या गटाचा मीही सदस्य होतो. त्या मिटिंगमध्ये विजयाराजे सिंधिया यांनी बाबरीला काही होणार नाही, असं सांगितलं होतं. आम्ही सर्वेतोपरी काळजी घेऊ. पण पंतप्रधानांनी कठोर पावलं उचलू नये, असं सिंधिया म्हणाल्या होत्या", असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

विजया राजे यांचा हा सल्ला नरसिंह राव यांनी स्वीकारला. त्यानंतर मी, गृहमंत्री आणि गृहसचिवांनी नरसिंह राव यांना भाजपवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला होता. कारण काहीही होऊ शकतं असं आम्ही सांगितलं होतं. पण पंतप्रधानांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यानंतर काय झालं हे तुमच्यासमोर आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज अजित पवारांचा रोड शो

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT