Cabinet expansions esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Politics: 'बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही' राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टचं सांगितलं

NCP Politics: राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं.

रुपेश नामदास

NCP News: राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते. या बंडामध्ये प्रहार पक्षाचे आमदार आणि तत्कालीन मंत्री बंच्चू कडू यांची देखील महत्त्वाची भूमिका होती.

शिंदे यांच्या सोबत जात नव्या सरकारमध्ये मंत्री पद मिळेल अशी अपेक्षा असलेले बच्चू कडू यांनी मंत्री पद मिळालं नाही म्हणून वेळोवेळी आपली नाराजगी बोलून दाखवली. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडू यांना आता मंत्रिपद मिळणार नाही असं म्हणत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

ते टीव्ही 9 शी बोलत असताना म्हणाले, "बच्चू कडू यांना आता मंत्रिपद मिळणार नाही, हे त्यांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय" असं विधान केलं आहे. तर त्यांनी थेट गणितच समजावून सांगितलं.ते म्हणाले, शिंदे गटातील ४० आमदारांनाही मंत्रिपद हवंय. तसंच भाजपच्याही अनेक नेत्यांना मंत्रिपद पाहिजे.

जर आपण पाहिलं तर पाच आमदाराच्या मागे एक मंत्रिपद येऊ शकतं. त्यामुळे शिंदे गटावा १२ किंवा १४ पर्यंत मंत्रिपदे मिळतील. तर बाकीच्या २६ लोकांना काय मिळणार? असं म्हणत त्यांनी बच्चू कडू यांना चिमटा काढला आहे.

'उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला पण अजित पवारांसोबत...'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी खंत बोलून दाखवली ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद नाही तर मनभेद झालेत, त्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यामुळे त्यांच्या सोबत भाजप कधीही जाणार नाही, त्यांच्यासाठी भाजपची दारं सध्यातरी बंद आहेत. असं बावनकुळे म्हणाले. (Latest Marathi News)

तर अजित पवारांवर बोलताना म्हणाले, अजित पवारांनी कधीही विश्वासघात केला नाही, त्यांच्याशी मतभेद आहे, पण मनभेद कधीही झालेला नाही.

बावनकुळे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या आहेत. अनेक वर्ष मित्र असलेले उद्धव ठाकरे आज भाजप शत्रू मानत आहेत, तर अनेक वर्ष विरोधात असलेल्या शत्रूला मित्र मानत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायमूर्ती यशवंत वर्मांना पदावरुन हटवण्याची प्रक्रिया सुरू; लोकसभेत १४५ तर राज्यसभेत ६३ खासदारांची नोटीस

जेवणात मिसळल्या 15 झोपेच्या गोळ्या अन् दिला करंट; पतीचा खून करणाऱ्या पत्नीचे दिराशी होते अनैतिक संबंध, Instagram चॅटमध्ये असं काय होतं?

’क्युँकी सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित! प्रेक्षक म्हणाले...

माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन यांचे १०१व्या वर्षी निधन, ५ वर्ष मुख्यमंत्री, १५ वर्ष विरोधी पक्षनेता अन्...; वाचा कारकिर्द

Auto Drivers Protest: विकासकाम की विनाशकाम? रिक्षाचालकांचा संताप, खड्ड्यांमध्ये बसून तीव्र आंदोलन

SCROLL FOR NEXT