
नवी दिल्ली: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील घरातून अर्धवट जळालेल्या नोटांचे बंडल सापडल्यानंतर, त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभेतील १४५ आणि राज्यसभेतील ६३ खासदारांनी न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.