NEET UG Topper esakal
महाराष्ट्र बातम्या

NEET UG Topper: पंक्चर काढणाऱ्या बापाची लेक होणार डॉक्टर, जाणून घ्या तिची Success Story

कुटुंब चालवण्यासाठी वडिल पंक्चर काढण्याच्या दुकानावर काम करतात.

धनश्री भावसार-बगाडे

Free Coaching Helped To Crack NEET : महाराष्ट्राच्या जालनामध्ये पंक्चरच्या दुकानावर काम करणारे अनवर खान यांची मुलगी मिस्बाहने NEET UG क्रॅक करून संपूर्ण कुटुंबाला आनंदी केलं. तिला नीट परीक्षेत 720 पैकी 633 गुण मिळाले आहेत. तिचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

मिस्बाहच्या घरची आर्थिक परिस्थिती फार खराब आहे. वडिल मोटरसायकलचे पंक्चर काढतात आणि आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती खराब असली तरी तिने मेहनत करून सेकंड अॅटंम्प्टमध्ये यश मिळवलं. आता ती MBBS करून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

मिस्बाह नीट पास झाल्याने तिच्या आई वडिलांच्या आनंदाला पारावार राहीला नाही. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिचे वडिल अनवर म्हणाले, "जर अंकूश सरांचे मार्गदर्शन लाभले नसते तर मिस्बाहला हे यश मिळवता आलं नसतं. गेली 2-3 वर्ष मिस्बाहला अंकूश सर मोफतमध्ये नीट मार्गदर्शन करत होते. आज कठीण परिश्रम आणि चिकाटीने माझ्या लेकीने संपूर्ण जालन्यात नीटमध्ये टॉप केलं आहे."

अंकूश सर म्हणाले, "आम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी एक योजना चालवतो. या योजनेंतर्गत आम्ही गरिब मुलांना मोफत शिकवतो. त्यातूनच मिस्बाहला मोफत शिक्षण मिळालं. आमच्या श्रमांना फळ मिळाल्याचा आनंद आहे."

मिस्बाहने सांगितलं की, जेव्हा घराची परिस्थिती वाईट होती तेव्हा ती दिवस रात्र अभ्यास करत होती. कधी हार मानली नाही. तिला MBBS डॉक्टर बनून गरिबांची सेवा करायची आहे. मिस्बाह शाळेपासूनच अभ्यासात हुशार आहे. 10 बोर्ड परीक्षेत तिला 92% गुण मिळाले होते. तर 12 वीला 86% मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चार तरुण गंभीर जखमी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT