Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : पवार घराण्यात राजकारण! साहेबांचे दोन नातू निवडणुकीच्या रिंगणात तरीपण...

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात असोसिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे दोन नातू समोरासमोर उभे राहिले होते. रोहित पवार आणि अभिषेक बोके यांच्यातील लढत थांबविण्यासाठी रविवारी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. त्यांच्या प्रयत्नांनंतरही या दोन नातवांमध्ये निवडणूक झाली. तर निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये या संघटनेचे अध्यक्षपदही रोहित पवार यांनी मिळविले आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

काल (रविवारी) एमसीएची निवडणूक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियममध्ये पार पडली. या निवडणुकीत या वेळेस संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार (शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू) आणि अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते.

अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या गोष्टीत लक्ष्य दिलं. त्यानुसार अभिषेक बोके यांनी माघार घ्यावी, असा आदेश दिला गेला. यासंबधी चर्चेसाठी शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला; परंतु त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला नाही. अखेर रविवारी सकाळी मतदान पार पडले. यामध्ये रोहित पवार विजयी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ‘मोदींचा वारसदार म्हणून...’

शरू खांद्यावर डोकं ठेवणार, तिच्या स्पर्शाने जय मोहरणार; दोघांची वाढती जवळीक पाहून प्रेक्षक खुश, सनई चौघडेचा नवा प्रोमो व्हायरल

मुळशी पॅटर्नमुळे मुलांना नोकरी मिळेना, लग्नही जुळेना? मुळशीकरांचा संताप; चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी

Marathi News Live Updates : गणेश उत्सवात डीजे वादनाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT