Rohit Pawar : ...हा आनंद वेगळाच! अध्यक्षपदी निवड होताच रोहित पवार लागले कामाला

Rohit Pawar
Rohit Pawaresakal

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात असोसिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी आवडत्या खेळासाठी काम करण्याची संधी मिळाल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, ''खेळासाठी मी माझ्यापरीने काम करतच आहे. पण माझ्या आवडीच्या क्रिकेट या खेळासाठीही काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती.

आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे MCA च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून तशी संधी मिळाली.आदरणीय पवार साहेबांनी सर्वच खेळासाठी सह्याद्रीइतकं मोठं काम केलं.ती उंची गाठणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नसलं तरी आदरणीय पवार साहेबांच्या रूपातील सह्याद्रीच्या शिखराकडं दीपस्तंभाप्रमाणे पाहूनच आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी खेळासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील!'' अशी पोस्ट रोहित पवारांनी इन्स्टाग्रामवर केली आहे.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

या निवडीनंतर रोहित पवार लगेचच कामाला लागले. त्यांनीच याबाबत सोशल मीडियावर फोटो शेअर करुन माहिती दिली. ''महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'च्या गहुंजे येथील स्टेडियमची माझे मित्र आणि क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासोबत पाहणी केली. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूसोबत स्टेडियमची पाहणी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो..'' असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar
Sharad Pawar : अभ्यास सोडून आम्ही इतर ठिकाणीच पुढे असायचो; पवारांनी सांगितला पूनावालांसोबतचा किस्सा

असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार हे क्लब गटाकडून विजयी झाले होते. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली होती. त्यानंतर असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. त्यावेळी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com