Ajit Pawar and Chandrakant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : आमदारांचे प्रश्न घेऊन पवारांनी चंद्रकांत पाटलांना धारेवर धरलं; म्हणाले, मुंबईला गेल्यावर...

संतोष कानडे

पुणेः विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांचा निधी आणि त्यांच्या प्रश्नांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरलं. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडवावा, अशी मागणी पवारांनी केली आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं होतं. या बैठकीला अजित पवार यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तीन-चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना निधीची कमतरता भासत आहे, शिवाय बिलं रोखली जात आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न तडीस जात नसल्याचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला.

काय म्हणाले अजित पावर?

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे आमदारांच्या निधीबाबत मागणी केली आहे. राज्यातील १ लाख ५ हजार कोटी रुपयांची बिलं थकलेली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बिलांचाही समावेश आहे. वरती विचारल्याशिवाय बिलं काढू नका, असे आदेश ट्रेझरीला आल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी यावेळी केला.

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, ३१ मार्चच्या आधी केलेल्या कामांची बिलं पेंडिंग आहे. त्यामुळे आम्ही चंद्रकांतदादांना मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासंदर्भात मागणी केली आहे. यासह पिण्याचं पाणी, कचरा, जलपर्णी, खड्डे, वीजेचे प्रश्न यासंबंधीच्या कामांसाठी निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केल्याचंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT