गोफण | पराभव जिव्हारी लागला अन् मोटाभाई दिल्लीकडे निघाले...

Gofan Series -  political comedy karnataka election result 2023
Gofan Series - political comedy karnataka election result 2023 esakal

Karnataka Election Result 2023: सेनापती मोटाभाईंचा गुटगुटीत चेहरा रात्रभर रडून-रडून सुजला होता. त्यामुळे तो आणखीनच गुबदुला वाटत होता. कानडदेशीचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला... काही वेळातच ते दिल्लीकडे प्रस्थान ठेवणार होते.

त्यामुळे 'बॅगा' भरायला घेतल्या. सामान भरताना एक भगवं जॅकेट हातात आलं. घडी करुन ते बॅगेत भरु लागले.. भगव्याकडे बघून मोटाभाईंनी एकच हंबरडा फोडला... हमसून हमसून रडायला लागले.

तेवढ्यात कानडदेशीची सत्ता गमावलेले बसवपंत बम्बई तिथं पोहोचले. 'चूप चूप के' सिनेमातल्या 'बांड्या'सारखं त्यांनी मोटाभाईलाग मागून धरलं आणि एकच गलका केला... मालिकSS..मालिकSSS... असं कसं झालं मालिक.. तुम्ही जावू नका..मालिक!

मोटाभाईंनी मागे न बघताच उजव्या हाताच्या कोपराने बम्बईंना मागे झटकलं, तसे बम्बई सावध झाले.

Gofan Series -  political comedy karnataka election result 2023
गोफण | एका दगडात पक्षी तरी किती मारावेत

मोटाभाई भयंकर चिडले होते. मागच्या कित्येक दिवसांपासून ते कानडदेशी ठाण मांडून होते. एवढा लवाजमा, साधनसामुग्री घेऊन ते दिल्लीतून कानडदेशी दाखल झालेले.

पुन्हा सत्ता काबिज करण्यासाठी सगळे डावपेच आखले, रात्रीचा दिवस केला, रंगाच बेरंग केला.. बळ कमी पडलं तर बजरंगबलीचा धावा केला... पण काहीही हाताशी लागलं नव्हतं. लोकांसमोर नाचक्की होऊन पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं.

त्यामुळेच भल्या पहाटे इथून निसटून जाण्याची योजना मोटाभाईंनी आखलेली. विसाव्यासाठी भाड्याने घेतलेला 'टू बीएचके फ्लॅट' आज सोडावा लागणार होता.

हा परभव म्हणजे अब्रूची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर टांगण्यचा प्रकार होता. शिवाय दिल्लीत गेल्यावर बादशहा नमोभाईंना कोणतं तोंड दाखवायचं; ही सगळी परिस्थिती मोटाभाईंना ठाऊक होती. त्यामुळे ते 'सीरियसली' रडत होते.

मोटाभाईंनी कोपराने झटका दिल्याने जागेवर आलेले बसवपंत बम्बई घाबरले. 'काय झालं मोटाभाई? एवढं मनावर घेऊ नका. गेली सत्ता जावू द्या. नाहीतरी मागच्यावेळी आली नव्हतीच की! आपणच आणलेली. यावेळीही आणता काय?'

Gofan Series -  political comedy karnataka election result 2023
Gofan | बोलभांडे रौतांची 'ती' खेळी उधार राजेंना कळली तेव्हा...

'खामोश! परिस्थितीचं काय गांभीर्य आहे की नाही तुम्हाला? मागच्या वेळी तेवढी तरी इज्जत उरली होती, म्हणून सावरता आलं. यावेळी तुम्ही नाक कापलंत नाक... कळतंय का? तुमचं काही आहे की नाही? का सगळं आमच्यावरच..' सेनापती मोटाभाई निर्वाणीचं बोलत होते. त्यांना मध्येच थांबवत बसवपंत बम्बई म्हणाले.

'तसं नाही मोटाभाई.. पण आम्हांला वाटलं सगळं तुम्हीच करता वरुन. आम्ही फक्त नावाला... ' बम्बईंना मध्येत रोखत मोटाभाई बोलले-

'थोडं जिभेला हाड-बिड आहे का तुमच्या. भींतीलाही कानं असतात. आता शांत राहा. आम्ही निघालोय दिल्लीकडे. सकाळी लोक उठायच्या अगोदर आम्हाला इथून बस्तान हलवावं लागेल. उजळ माथ्याने जावं, तेवढीही अब्रू ठेवली नाहीए तुम्ही.. आम्हांला वाटं लावायला यायची गरज नाहीये... कारण पुरती वाट लागलीय!' (Marathi Tajya Batmya)

Gofan Series -  political comedy karnataka election result 2023
गोफण| फडतूस नहीं काडतूस!

असं म्हणून मोटाभाईंना दोन बॅगा घेतल्या अन् फ्लॅटचा दरवाजा चपळाईने उघडला. बाहेर पडणार तेवढ्यात तिथे आशिककुमार आले. आशिककुमार म्हणजे डीके. डी-के-आशिककुमार! 'आशिक हूं मैं..' असं गाणं म्हणतच ते आत आले. हे दोघे डोळे फाडून त्यांच्याकडे बघत होते.

'काय पाव्हणं, निघाले का? थांबा की चार-दोन दिवस. आता आमचा पाहुणचार घ्या. बँड, बाजा, लेझिम, मिरवणूक अन् ९१ तोफांची सलामी बघायला थांबा..' डीकेंचं बोलणं मोटाभाईंना कानात उकळत्या तेलासारखं भासत होतं. (Latest Marathi News)

तोफा ९१च का? असा प्रश्न बम्बईंना पडला असला तरी मोटाभाईंना पडला नव्हतां. तेवढं त्यांचं राजकारण पक्कं होतं. डीकेंवर एक जळजळीत नजर टाकून मोटाभाई झपकन् बाहेर पडले. रागाच्या भरात एकटेच बॅगा घेऊन निघाले होते.

'जय बजरंगबली!' डीकेंनी दोन्ही हात जोडून धार्मिक निरोप देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मोटाभाय मागे बघायला तयार नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com