Pune Porsche Crash  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

संतोष कानडे

पुणेः हिट अँड रन प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभर पुण्याच्या घटनेची चर्चा सुरु आहे. उद्योगपतींना आणि श्रीमंतांना वेगळा कायदा आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आर्यन नावाच्या एका रॅपरने एक रॅप तयार करुन खपवलं होतं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्याची एक प्रतिक्रिया पुढे आलीय.

रॅपर आर्यन म्हणतो, मूळ प्रकरणामधून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे. मी कुणालाही शिवीगाळ केली नाही. तरीही कलम ४१ ए नुसार ५०९ आणि २९४ कलमान्वये माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मूळ प्रकरण बाजूला राहिलं असून फोकस माझ्यावर आला आहे.

आर्यन पुढे म्हणतो, मी करोडपतीचा मुलगा नाही, मी एक मिडल क्लास आहे. माझा जीव घेतला तरी माझ्या जीवाची काहीच किंमत नाहीये. मी कोणत्याही महिलेविरुद्ध काहीही बोललेलो नाही.. मी केवळ रँडमली व्हिडीओ बनवलेला होता. असं म्हणत आर्यनने सारवासारव केली.

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन बुधवारी (२२ मे) रद्द करण्यात आला असून आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पण यापूर्वी आरोपी अल्पवयीन असल्याचं कारण देत त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहून जामीन देण्यात आला होता. यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. जामीन मिळाल्यानंतर आरोपी मुलाने रॅप साँग तयार केले असल्याचे सांगितले जात होते. या व्हिडीओमधील मुलाने अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली असून रॅप साँग गाताना तो लोकांना शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहे. तसेच पुन्हा रस्त्यावर येण्याची भाषा देखील तो वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान हा व्हिडिओ आर्यन नावाच्या एका Instagram क्रिएटरचा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. त्यानंतर त्याने स्वतःची बाजू मांडत मूळ प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी मला टार्गेट केल्याचं रविवारी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT