महाराष्ट्र बातम्या

Rahul Kanal : राहुल कनल यांचा ठाकरेंना जाहीर 'जय महाराष्ट्र!' म्हणाले, आता अहंकार सर्वांना दिसेल

Sandip Kapde

Rahul Kanal : वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सर्व युवासेना युवक पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आल्यानंतर राहुल कनल यांनी ठाकरे गटाच्या विरोधात पहिलं ट्विट केलं आहे. राहुल कनल यांनी ठाकरेंना जाहीरपणे जय महाराष्ट्र केला आहे. उद्या कनल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

युवासेना युवक पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्याच्या मुद्द्यावर राहुल कनल म्हणाले , जय महाराष्ट्र मी प्रमाणिक काम करणाऱ्या, दिवस-रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माफी मागतो. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल. पण ही फक्त सुरूवात आहे. जी तुम्ही सुरू केली.

दुःख होतंय हे कोणी केले हे चांगले माहीत आहे. पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केले आहे, अशा लोकांना न ऐकता काढून टाकणे म्हणजे अहंकार आहे. तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही ज्यांनी रात्रंदिवस काम केले. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के अहंकार क्या होता है, असे कनल म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राहुल कनल हे उद्या १ जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या वर्षी राहुल कनल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडला होता. तेव्हापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. यामुळे ठाकरे गटाने सावध पाऊल उचलले आहे.

दरम्यान राहुल कनल यांच्या विभागातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधील युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हे आदेश काढण्यात आले. राहुल कनाल हे उद्याच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : गुरुवार पेठेत दुचाकी चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT