Raigad 
महाराष्ट्र बातम्या

Raigad: किल्ले रायगडावर मोठी दुर्घटना; विद्युत रोषणाई करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

रुपेश नामदास

रायगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. सजावटीचे काम करताना राजदरबार येथे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे.

यासाठी गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गड किल्ल्यांची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या डागडुजीची कामे सुरु झाली आहेत. काही गडांवर सजावटीच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

नेमकं काय घडलं?

६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडणार आहे. याठिकाणी सध्या सजावटीचे काम सुरु आहे. हे काम करताना गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही व्यक्तींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यातील एका व्यक्तीला विजेचा तीव्र झटका बसला. शॉक लागल्याने तो जागीच कोसळला.

शॉक लागून व्यक्ती खाली पडल्यावर त्याला वाचवण्यासाठी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषीत केले. पुढे त्याचा मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. मृत कामगाराचे नाव आणि ओळख अद्याप समजू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT