Raigad Suspected Boat esakal
महाराष्ट्र बातम्या

Raigad News: रायगडच्या किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीचं पाकिस्तान कनेक्शन नाही

रायगडच्या किनाऱ्याजवळ संशयास्पद बोटीबाबत नवीन माहिती समोर

रुपेश नामदास

रायगडच्या किनाऱ्याजवळ संशयास्पद बोटीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नसल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. मात्र ही बोट ज्यावेळी आढळली त्यावेळी या बोटीत पाकिस्तानी नागरीक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.

या बोटीचे नाव 'जलराणी' असून ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी नावाच्या व्यक्तीच्या मालकीची आहे. मागील दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षांनी दिली.

सकाळी ही बोट पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद रित्या आढळली होती. तर या बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याचे वृत्त काही न्यूज चॅनलने दिले होते. ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती. मात्र यात खलाशांची आधार कार्ड तपासल्यानंतर कोणी ही पाकिस्तानी नागरिक नसल्याचे कोलासो यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : ...'मग माझा राजीनामा का मागता?' पेपरफुटीवरुन 'एमपीएससी'चे अध्यक्ष विवेक भीमनवारांचे खुले पत्र

सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रेयस अय्यर; ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी पुन्हा मुंबईकर समोरासमोर, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाचा OBC 'क्रिमी लेयर' आरक्षणावर मोठा निर्णय; केंद्राला अंतरिम दिलासा देण्यास नकार

मराठी कलाकारांना हिंदी मालिकांच्या सेटवर कसं वागवलं जातं? ‘वाहिनीसाहेब’ फेम अभिनेत्रीने सांगितलं सेटवरचं वातावरण

‘बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…’ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा डान्स पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT