Narayan Rane: नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर...
Narayan Rane
Narayan Rane esakal
Updated on

ठाकरे आणि राणे वाद तसा जुणाच आहे. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन पासून त्यात अजूनच भर पडली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी शिंदे गट , भाजप आणि राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Narayan Rane
Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य! म्हणाले, "नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते..."

दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचं भाकीतच नाईक यांनी वर्तवलं आहे. हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे. असं देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला.

तर पुढं म्हणाले की, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

Narayan Rane
पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट; बोटीत पाकिस्तानी नागरिक

तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना म्हणाले, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Data Center
पंढरपूर चंद्रभागा नदी
CM Devendra Fadnavis Speech Kankavli
Narayan Sai divorce case verdict highlights ₹2 crore alimony order by Indore family court after an 8-year legal battle.
Marathi News Esakal
www.esakal.com