Akola Marathi News Rs 7 lakh compensation to women involved in railway accident sakal
महाराष्ट्र बातम्या

Railway News: रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांना मिळणार तत्काळ उपचार

सकाळ डिजिटल टीम

Railway News: रेल्वे अपघातातील जखमी आणि अचानक प्रकृती खराब झालेल्‍या प्रवाशांना आता तातडीने वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. याकरिता मध्य रेल्वेने मुंबई विभागातील ३२ रेल्वे स्थानकानजीक खासगी रुग्णालये, क्लिनिक, नर्सिंग होम, अशा ५८ आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेशी करार केला आहे. त्यामुळे आता रेल्वे अपघातात जखमी प्रवाशांना तत्काळ उपचार मिळणार आहेत.

रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २६ मार्च २००९ ला रेल्वेला दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डानेही देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मध्य रेल्वेने आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू केले होते.

याची जबाबदारी खासगी हॉस्पिटल आणि औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना दिली आहे; परंतु वैद्यकीय कक्षात डॉक्टर आणि आपत्कालीन वैद्यकीय साहित्य उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्‍या.

प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३२ रेल्वे स्थानकांच्या ५०० मीटर परिसरातील रुग्णालये, नर्सिंग होम यांच्याशी संलग्न होत कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रुग्णालये, नर्सिंग होम आणि क्लिनिक अशा ५८ आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेशी मध्य रेल्वेने करार केला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

२६ स्थानकांत आपत्‍कालीन उपचार कक्ष

मध्य रेल्वेवर सध्या १७ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आहेत. आता आणखी २६ स्थानकात आपत्कालीन कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर या स्थानकांच्या ५०० मीटर परिसरातील रुग्णालये, नर्सिंग होम यांच्याशी करार करण्यात येणार आहे.

असा होणार उपचार-

रेल्वे अपघातात जखमी प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय कक्षात प्राथमिक उपचार देऊन करार केलेल्या रुग्णालयात पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, प्राथमिक उपचार रेल्वे प्रशासनाकडून निःशुल्क असणार आहे. त्यापुढील खर्च रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना करावा लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

Jarange Audio Clip: ''500 कोटींचं सोडा.. जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?'', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, जवळची माणसं फोडून...

Marathi News Live Updates:साताऱ्यात मतदानादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे समोरासमोर, हस्तांदोलनासह मिश्किल टोलेबाजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताय? चुकीचा रंग आणू शकतो गरिबी! घर रंगवताना नक्की पाळा वास्तूचे 'हे' नियम...

SCROLL FOR NEXT