Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेल्यावर कसं वाटलं? राज ठाकरेंच्या आई म्हणाल्या...

Sandip Kapde

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद देखील गेले. जेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळालं तेव्हा राज ठाकरे यांच्या आई उद्धव ठाकरे यांच्या मावशी यांनी त्यांची गळाभेट घेतली होती.

मात्र महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले. या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांना काय वाटले. यावर त्यांनी स्वत: भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले त्यावेळी मला वाईट वाटले, असं मधुवंती ठाकरे म्हणाल्या.

उद्धव याला देखील लहानाचं मोठ होतांना मी पाहीलं. असं काही व्हावं, अशी इच्छा नव्हती, असे मधुवंती ठाकरे म्हणाल्या. ठाकरे कुटुंब आज माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर १५ मे पूर्वी निकाल येण्याची दाट शक्यता आहे. निकाल जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं गेला तर फारशा उलथापालथी होणार नाहीत. मात्र जर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निकाल लागला तर मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT