Raj Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : ''तडजोड करावी लागली तर घरात बसेन, पण...'' राज ठाकरे थेटच बोलले

संतोष कानडे

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. एकीकडे शरद पवार, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि तिसरीकडे राज ठाकरेंनी कोकणापासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज चिपळूणमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

येत्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यामध्ये जो व्यभिचार सुरु आहे तो मी कधीही करणार नाही. तडजोड करावी लागली तर घरात बसेन परंतु तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर ते पुढे खेड, दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांची उपस्थिती आहे.

पदाधिकाऱ्ऱ्यांशी संवाद साधतांना राज ठाकरे म्हणाले की, पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही. आपण आपला विचार पोहोचवण्याची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी पदांनी एकमेकांशी बोलण्याऐवजी मनांनी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. सत्तापक्षाच्या वतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं प्रत्येक जिल्ह्यात आयोजन केलं जात आहे. एकूणच २०२४ लोकसभा, विधानसभा आणि संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांचीच पक्षबांधणी जोमात सुरु असल्याचं दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT