महाराष्ट्र बातम्या

अमित शहांचे अभिनंदन करत राजू शेट्टींनी केलं आणखी एक आवाहन

कारखानदारांनी त्वरित रक्कम जाहीर न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देऊ

स्नेहल कदम

कारखानदारांनी त्वरित रक्कम जाहीर न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देऊ, उसाचे एकही कांडे करखान्यापर्यंत जाऊ देणार नाही

कोल्हापूर - कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात सध्या एफआरपी वरुन आंदोलने आणि सभा सुरु आहेत. एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कारखानदारांनी त्वरित रक्कम जाहीर न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देऊ, उसाचे एकही कांडे करखान्यापर्यंत जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. दरम्यान सहकारमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयातील असमन्वयाचा गोंधळ संपवून 'एफआरपी'पेक्षा जादा ऊसदर देणाऱ्या साखर कारखान्यावर आकारलेला आयकर रद्द करून एक चांगला निर्णय घेतला असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राजू शेट्टी यांनी ट्वीट करुन अमित शहा यांना आवाहन केले आहे. ते म्हणतात, सहकारमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयातील असमन्वयाचा गोंधळ संपवून 'एफआरपी'पेक्षा जादा ऊसदर देणाऱ्या साखर कारखान्यावर आकारलेला आयकर रद्द करून एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! आता ऊसदर नियंत्रण समितीच्या मान्यतेने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांना 'एफआरपी'पेक्षा जादा दर देता येईल. अमित शहा यांनी असाच निर्णय घेऊन नीती आयोगाने सुचवलेल्या तीन टप्प्यातील 'एफआरपी' देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली; मात्र सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखानदार याबाबत ब्र शब्दही उच्चारायला नाही. यामुळे सतंप्त कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले. चाकातील हवा सोडली. बहे पुलावर कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर आल्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT