किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

kiran Gosavi
kiran GosaviSakal
Summary

आर्यन खान प्रकरणानंतर चर्चेत असलेल्या आणि पुणे पोलिसांनी फरार घोषित केलेल्या किरण गोसावीला अखेर ताब्यात घेण्यात आलं आहे.

आर्यन खान प्रकरणी चर्चेत आलेला आणि पुणे पोलिसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात फरारी घोषीत केलेला संशयित आरोपी किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी पकडले आहे. बुधवारी रात्री त्याला कात्रज भागातून ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी किरण गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती गोसावीने पसरवली होती. त्यासाठी पुणे पोलिसांकडून तयारीसुद्धा कऱण्यात आली. पण रात्री उशिरापर्यंत गोसावीला पकडता आले नव्हते.

एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेताना पंच म्हणून किरण गोसावी त्यावेळी उपस्थित होता. त्याने आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीची बरीच चर्चा झाली. त्यानंतर किरण गोसावी हा पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून पुणे पोलिस किरण गोसावीचा शोध घेत होते.

गोसावीच्या अंगरक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता होता. तसंच गोसावीने सोमवारी वृत्तवाहिन्यांशी फोनद्वारे संपर्क साधून आपण महाराष्ट्र पोलिसांऐवजी उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे म्हटलं होतं. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकेसुद्धा रवाना झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com