Ravindra Waikar inquiry esakal
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya : पाच तासांनंतर रवींद्र वायकरांची चौकशी संपली; बाहेर येताच किरीट सोमय्यांवर आगपाखड

संतोष कानडे

Ravindra Waikar inquiry : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपाप्रकरणी आज चौकशी झाली. गुन्हे शाखेने तब्बल पाच तास चौकशी केल्यानंतर वायकर बाहेर पडले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना वायकरांनी खालच्या भाषेत किरीट सोमय्या यांच्यावर टिपण्णी केली.

महानगर पालिकेच्या जागेवर हॉटेल बांधल्याचा रवींद्र वायकर यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी भाजप नेते तथा खासदार किरीट सोमय्या यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केलेली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये वायकर यांनी हा मुद्दा उपस्थित करुन जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा ठपका ठेवला होता.

त्यानंतर आज वायकरांची गुन्हे शाखेने तब्बल पाच तास चौकशी केली. बाहेर आल्यानंर रवींद्र वायकर म्हणाले की, मला जेवढा त्रास देता येईल तेवढा दिला जात आहे. परंतु मी कायद्याच्या बाहेर काहीही केलेलं नाही. माझं बांधकाम १९९१च्या जीआर प्रमाणेच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून कायद्यानुसारच वागलो आहे. त्यामुळे मला चौकशीसाठी जिथं बोलावलं जाईल तिथं मी जाणार.

पुढे बोलतांना वायकर म्हणाले की, माझी वरच्या मजल्यावर चौकशी सुरु असतांना किरीट सोमय्या खाली येऊन वरती अधिकाऱ्यांना फोन करत होते. हा विकृत मनुष्य असून त्याच्या निचपणाला मर्यादा नाहीत. विनाकारण लोकांना त्रास देण्याचा हा अद्योग असल्याचं वायकरांनी स्पष्ट केलं.

अधिवेशनामध्ये वायकर काय म्हणाले होते?

रविंद्र वायकर म्हणाले होते की, माणुसकीने जगलं पाहिजे, माणुसकीने वागलं पाहिजे. खोटेनाटे आरोप करुन बदनाम करणार असाल तर चुकीचं आहे. आमच्यावर मुंबई महानगर पालिकेच्या भूखंडाच्या बाबतीत सुरुवातीला ५०० कोटींचे आरोप केले. त्यात तथ्य नव्हतं. नंतर म्हणाले आलिबागला १९ बंगले आहेत. जेव्हा अलिबागला गेले तेव्हा तिथे काहीच सापडलं नाही. मग म्हणाले मुख्यमंत्र्यांनी बंगले गायब केले, असं वागणं चूक आहे.

एखाद्यावर खोटेनाटे आरोप करायचे, बदनामी करायची त्यामुळेच देवाची काठी कधी ना कधी पडते. ती काठी आज पडली. बीभत्स वर्तणूक विकृत वृत्ती देशाला दिसून आली, असं म्हणत आमदार वायकर यांनी किरीट सोमय्या यांचं थेटपणे सभागृहात नाव घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT