Rupali Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Rupali Patil: 'पेरणार तेच उगवणार', रुपाली पाटलांचे सुचक ट्विट

शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं झालेल्या शिंदे आणि ठाकरेंच्या भाषणांनी आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rupali patil thombre: शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं झालेल्या शिंदे आणि ठाकरेंच्या भाषणांनी आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. राजकारणातील वेगवेगळ्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तर प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले शाब्दिक हल्ले नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यांनी एकेरी शब्दांत ठाकरेंचा उल्लेख करुन यापुढे एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणत्याही मंत्र्यांविषयी वाईट बोललात तर पाहा... अशा शब्दांत ठाकरेंना तंबी दिली आहे.

यासगळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेल्या ट्विटनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या त्यांचे ट्विट चर्चेत आले आहे. जेव्हापासून दसरा मेळावा झाला आहे तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची तुलना सुरु झाली आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या नातवाचा आपल्या भाषणात केलेला उल्लेख सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. शिंदे यांच्या मुलानं श्रीकांत शिंदे यांनी तर ठाकरेंना भावनिक पत्र पाठवून आपला राग व्यक्त केला आहे.

पुणे शहरातील चौकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा फलक लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी रुपाली पाटील यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्या म्हणतात, बापा पासून नातवा पर्यंत राजकारण गेले -दुदैवच. पण पेरणार तेच उगवणार, नैतिकता सोडून वागले, बोलले की आपल्या भोगावे लागते. या पुढे राजकारणातील नैतिकता सोडू नका म्हणजे अशी वेळ कोणावर येणार नाही. राजकारणातील दर्जा राजकारणी लोकांनी जपावा मग सल्ले द्यावे. असेही त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT