Narayan Rane: नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane Press

Narayan Rane: नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...'

Narayan Rane Press Conference: दसऱ्याच्या निमित्तानं शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जोरदार भाषण झाले. मात्र त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर संमिश्र पद्धतीनं उमटताना दिसत आहे. ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कडाडून टीका केलीय. राणे यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकेचा वचपा काढला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये राणे म्हणाले, आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही. देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करु नका. काही झालं तरी उद्धव ठाकरे जबाबदार असतील. थोडी तरी मर्यादा ठेवा. तुम्ही मंत्रालयात येऊ शकत नाही. वीस मिनिटे हा माणूस चालू शकत नाही. त्याला सतत डॉक्टरांचा सल्ला लागतो. अशा एकेरी शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

हेही वाचा: Viral Video: 'आता कसं वाटतंय'? पोलिसांनीच नाठाळांच्या कानात वाजवले 'भोंगे'!

2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे. या माणसानं हिंदूत्वाबद्दल काहीही बोलू नये. त्याचे बेगडी हिंदूत्व आहे. मोदींचे नाव सांगून त्यानं आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. अशा शब्दांत नारायण राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Narayan Rane vs Manisha kayande : राणेंच्या चाफ्याच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या कायंदेंनी दाखवला धतुरा