अमानोरा फर्न हॉटेल्स अँड क्‍लब, हडपसर (पुणे) - तारे-तारकांच्या झगमगाटात ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’चे गुरुवारी वितरण करण्यात आले. या वेळी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्या नृत्याने प्रेक्षकांना मोहवून टाकले. 
महाराष्ट्र बातम्या

‘आनंदी गोपाळ’, ‘बाबा’चा ‘सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड्समध्ये डंका!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रंगीबिरंगी दिव्यांचा लखलखाट, सूर-तालांवर थिरकायला लावणारी मनोहारी नृत्ये आणि चित्रपटसृृष्टीतील तारे-तारकांच्या झगमगाटात रंगलेल्या सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड मोहोर उमटली.

हडपसर येथील अमानोरा क्‍लबच्या भव्य प्रांगणात तीन तास हा सोहळा रंगला. मुंबापुरीतील अवघे तारे-तारका या सोहळ्यात अवतरले होते. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाने पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘आनंदी गोपाळ’साठी समीर विद्वांस यांना, सर्वोत्कृृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’साठी ललित प्रभाकर आणि ‘मोगरा फुलला’तील स्वप्नील जोशी यांना देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘हिरकणी’ चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी यांना मिळाला. प्रेरणादायी चित्रपटाचा पुरस्कार ‘ठाकरे’ या सिनेमाला मिळाला. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक मृणाल पवार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार यांच्यासह पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. सिनेक्षेत्राचा कॅनव्हास रंगविणाऱ्या कलाकारांना ‘सकाळ प्रीमियर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच पुण्यनगरीला आकार देणाऱ्या, उद्योग आणि समाजबांधणी करण्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘आयकॉन ऑफ पुणे’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्य पुरस्कार
सर्वोत्कृष्ट संकलक : अपूर्वा मोतीवाले, आशिष म्हात्रे. कलादिग्दर्शक : सतीश चिपकर (खारी बिस्कीट), सिनेमॅटोग्राफर : मृदुल सेन (खारी बिस्कीट), बालकलाकार : आर्यन मेघजी (बाबा), आदर्श कदम (खारी बिस्कीट). पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी इंगवले (पांघरूण), संवाद : सुमित्रा भावे (वेलकम होम), पटकथा : मनीष सिंग (बाबा), कथा : मनीष सिंग (बाबा), पार्श्वसंगीत : अभिनय जगताप, क्षितिज रथ (सूरसपाटा), गायक : आदर्श शिंदे (खारी बिस्कीट), गायिका : केतकी माटेगावकर, शरयू दाते (आनंदी गोपाळ), गीत : वैभव जोशी (आनंदी गोपाळ), संगीतकार : जसराज, सौरभ, ऋषीकेश (आनंदी गोपाळ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांना घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

Live Updates Marathi : फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

Petrol-Diesel News: पाकिस्ताननंतर अमेरिकेत पेट्रोल महाग! आता भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार?

NDRF Land Allocation: मावळातील सुदुंबरे येथे एनडीआरएफला ३ हेक्टर सरकारी जमीन विनामूल्य; मंत्रिमंडळाचा निर्णय कायमस्वरूपी तळाला बळ

Pune Crime : नवले पूल परिसरातील लॉजवर पोलिसांचे छापे; नऊ तरुणींची सुटका, लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT