राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

अनेक मंत्र्यांचा होणार शपथविधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह फक्त सहा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रमुख नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे. 

मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेळेची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नसल्याचे राज्यपालांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजभवनाकडून आज (गुरुवार) एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले यातून याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे, की राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सोमवारी (ता. 30) होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केली नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त हे पूर्णतः निराधार आहे, असे राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी स्पष्ट केले आहे.

दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे

मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दुपारी एक वाजता सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत संपवावा, अशी तोंडी सूचना राज्यपाल कार्यालयाकडून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावरून सत्ताधारी पक्षांकडून नाराजी दर्शविण्यात आली होती. 

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक

अनेक मंत्र्यांचा होणार शपथविधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह फक्त सहा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रमुख नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Governor Bhagatsingh Koshiyari gives time limit to government