Sharad Pawar Resigns Sakal-Saam Survey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: अजितदादांचा भाजपासोबत जाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी पवारांची निवृत्ती? समर्थकांनी दिलं उत्तर

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल 'सकाळ-साम'ने जाणून घेतला आहे

सकाळ डिजिटल टीम

Sakal-Saam TV Survey 2023

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा काल मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती देखील केली.या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात सध्या मोठ्या चर्चा, तर्क वितर्क लावले जात आहेत. (Sharad Pawar Resigns)

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल जाणून घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या समर्थकांचा कल सकाळने समजून घेतला. यामध्ये महिला पुरुषांचा समावेश असून यात सर्व वयोगटातील समर्थकांचा समावेश आहे.

या संपूर्ण घटनेवर 'सकाळ-साम'ने रिसर्च केला आहे. यामध्ये विचारण्यात आलेल्या 'अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी निर्णय घेतला आहे, असे वाटते का? या प्रश्नावर ४१ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर ३६.६ % लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. तर २२.४% लोकांनी सांगता येणार नाही असे म्हंटले आहे.

राष्ट्रवादी समर्थक म्हणतात

हो 19.43529412

नाही 60.42352941

सांगता येत नाही 20.23529412

या रिसर्चच्या माध्यमातून समर्थकांनी दिलेल्या निष्कर्षानुसार असे दिसून येते की, अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला नाही.

तर 'अजित पवार यांनी भाजप सोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल, असे वाटते का?' या प्रश्नावर अजित पवार यांनी भाजप सोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल याबद्दल ५९.६ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर २०% लोकांनी हो उत्तर दिले आहे. सांगता येत नाही असं नोंदवणारी लोकं २०.३% आहेत.

या रिसर्चच्या माध्यमातून समर्थकांनी दिलेल्या निष्कर्षानुसार असे दिसून येते की, अजित पवार भाजपसोबत गेले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार नाही असं जास्त समर्थकांना वाटतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT