Sharad Pawar Resigns as ncp chief supriya sule ajit pawar solapur politics
Sharad Pawar Resigns as ncp chief supriya sule ajit pawar solapur politicsesakal

Sharad Pawar Resigns: 'तारीख ठरली! समितीचा निर्णय मान्य', राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंबंधी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय काल कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्यानंतर मी माझ्या निर्णयावर विचार करेन असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. (Marathi Political News)

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं ते म्हणाले आहेत. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यांनी 5 मेला बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपल्याला मान्य असेल असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar Resigns as ncp chief supriya sule ajit pawar solapur politics
Praful Patel: प्रफुल्ल पटेल अध्यक्षपद घेणार नाहीत, जयंत पाटलांच्या नाराजी बद्दल केले मोठे विधान

तर पुढे पवार म्हणाले की, 'मी पक्षातील वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असं मला आता वाटतं आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मे रोजीची बैठक 5 मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Sharad Pawar Resigns as ncp chief supriya sule ajit pawar solapur politics
Nana Patole: 'आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये', नाना पटोलेंनी राऊतांना दिली तंबी

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांनी सांगितल्यानुसार ही बैठक 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे ला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com