Sambhaji Bhide  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide Controversy: 'संभाजी भिडेंचे पाय तोडल्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस', MIMच्या नेत्याचं वक्तव्य

एमआयएमच्या नेत्याचे आंदोलनावेळी वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे कायम या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक विधान करुन वाद ओढावून घेतला होता. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचा आम्ही निषेध करतो. वारंवार महापुरुषांवर अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भिडे हे नथुराम गोडसे याची औलाद असल्याचा आरोप करत जो कोणी भिडे यांची मिशी न कापता पाय तोडून आणेल त्यांना मी दोन लाख रुपये देणार असल्याची घोषणा सोलापूर एमआयएमचे शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

एमआयएमच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

प्रवक्ते कोमारो सय्यद म्हणाले, महात्मा गांधी हे थोर नेते होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान फार मोठे आहे. अशा महापुरुषांविषयी संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य करीत आहे. अशा देशद्रोही भिडे यांना राज्य, केंद्र सरकार पाठिशी घालत आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा निषेध करतो. भिडेंना तातडीने अटक करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT