Indapur News: विहिरीचं काम सुरू असताना अपघात; चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, NDRFकडून बचावकार्य सुरू

विहिरीचे रिंग करण्याचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला
Indapur News
Indapur NewsEsakal

म्हसोबाची वाडी (ता.इंदापूर) येथे ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे रिंग करण्याचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकल्याची घटना घडली. बचावासाठी रात्रभर पाच पाेकलेन मशिनच्या साह्याने माती व मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु असून एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून युद्द पातळीवरती बचावकार्य सुरु आहे.

म्हसोबाच्या वाडी परीसरामध्ये ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे काम सुरु आहे. विहिरीचा वरचा भाग माती कच्चा मुरुमाचा असल्यामुळे ३० फुट खोल जमिनीमध्ये रिंग (सिमेंट क्राॅक्रिंटीकरण) करण्याचे काम सुरु आहे.

मंगळवार (ता.१) रोजी तालुक्यातील बेलवाडी गावातील चार युवक काम करीत होते. मात्र अचानक वरच्या बाजुने मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. रात्रभर चार पोकलेन मशिनच्या सहाय्याने माती व मुरुम असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

विहिरीची रिंग मारण्याचं काम सोमनाथ लक्ष्मण गायकवाड वय 32 वर्ष, जावेद अकबर मुलानी वय 30 वर्ष,परशुराम बन्सीलाल चव्हाण वय 30 वर्ष आणि मनोज मारुती चव्हाण वय 40 वर्ष हे चार करीत होते. अचानक रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला. त्या ढिगार्‍याखाली हे चारही जण कालपासून अडकले आहेत.


Indapur News
Samruddhi Mahamarg Accident: मोदींच्या कार्यक्रमानंतर शिंदे पोहचले थेट शहापुरातील दुर्घटनास्थळी, चौकशीचे दिले आदेश

चारही कामगार नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपल्या घरी परतले नाहीत तेव्हा शोधाशोध सुरू झाली. शोध घेत असताना शेवटी ते विहिरीजवळ येऊन थांबले. विहिरीजवळ त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसल्या, मात्र ते चार लोक सापडले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. त्यानंतर काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे. 

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, भिगवण पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार घटनास्थळी मदत करण्यााचे काम करीत होते. तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांच्यासह रात्रभर अनेक युवक मदत करीत हाेते. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे सकाळी लवकर घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफ जवानाच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.

Indapur News
Pune : पीएमपीच्या अपघातात वाहक-चालकासह २९ प्रवासी जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com