समृध्दी महामार्ग google
महाराष्ट्र बातम्या

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन ढकललं पुढे, 'या' कारणामुळे तारीख बदलली

महाराष्ट्रदिनाच्या मुहुर्तावर हा महामार्ग सुरु व्हावा असे ठरलं असताना आता ते शक्य होणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रदिनाच्या मुहुर्तावर हा महामार्ग सुरु व्हावा असे ठरलं असताना आता ते शक्य होणार नाही.

मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरुन अनेक गोष्टी घडल्या आहेत. येत्या २ मे ला या महामार्गाचं उद्घाटन केल जाणार होतं. मात्र हा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या टप्प्याचं उद्घाटनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त केलं जाणार होतं. महाराष्ट्रदिनाच्या मुहुर्तावर हा महामार्ग सुरु व्हावा असे ठरलं असताना आता ते शक्य होणार नाही. कारण २ मे चा मुहुर्त टळला आहे. (samruddhi mahamarg inauguration event postponed)

नागपुरला मुंबईशी जोडणाऱ्या समृध्दी महामार्गाचे २ मे रोजी होणारे उद्घाटन लांबणीवर पडणार आहे. प्राण्यांच्या वाहतुकीसाठी तयार केलेला एक बायपास मध्येच कोसळल्याने महामार्ग उद्घाटन पुढे ढकलावे लागणार आहे. वाहतूक सुरु झाल्यानंतर प्राण्यांच्या हालचालीत अडथळा येणे उचित ठरणार नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वन्यजीवांबद्दल कमालीची आस्था असल्याने ठाकरे परिवाराला हा संवेदनशील विषय वाटला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बायपासच्या बांधकामात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत हे पाहून नव्याने काम केले जाणार आहे.

त्यामुळे दोन मे रोजी होणारे महामार्गाचे उद्घाटन आता पुढे ढकलण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं असून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची पुढची तारीख कोणती असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूर- मुंबई 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT