इज्जत मागावी लागत नाही तर मिळवावी लागते, नितेश राणेंचा रोख कुणावर?

या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, कारण..
Nitesh Rane
Nitesh Rane esakal
Summary

या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, कारण..

काल मुंबईत लता मंगेशकर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मात्र, या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. कारण, पुरस्कार वितरण समारंभाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव नव्हते. यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा झाल्या. मंगेशकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न टाकून १२ कोटी मराठी माणसांचा अपमान केल्याची टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. (Jitendra Awhad said, Mangeshkar family insulted Marathi people) मात्र मंगेशकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचं नाव का घातलं नाही, हे समजू शकलेलं नाही.

यासंदर्भात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आव्हाडांच्या या वक्तव्याला प्रतित्त्युर दिले आहे. ट्विट करत राणे म्हणाले, मंगेशकर कुटुंबियांनी ठाकरे कुटुंबियांना काल दिले, ईज्जत मागावी लागत नाही तर ती मिळवावी लागते, असे म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबाला सणसणीत टोला लगावला आहे. एरव्ही ही आमदार नितेश राणे हे शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप होत राहतात.

Nitesh Rane
'राष्ट्रपती राजवट लावा', भाजप नेते दिल्लीत पोहोचण्याआधीच आव्हाडांचं ट्वीट

दरम्यान, या समारंभाला (Lata Mangeshkar Award Ceremony) विविध मान्यवर उपस्थित होते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. राज्यातील भाजप-शिवसेनेतील (BJP) वाढता वाद पाहता मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला न येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. तसेच निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याने त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळल्याचे बोलले जात होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) दिला जाणार आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला.

Nitesh Rane
"ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा, अशी ऑफर"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com