महाराष्ट्र बातम्या

Sana Khan Murder Case: सना खानच्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पप्पूच्या लॅपटॉपमधून ‘सेक्सटॉर्शन रॅकेट’चा खुलासा ?

सना खानच्या (वय ३४) माध्यमातून पप्पू ऊर्फ अमित शाहू हा ‘सेक्सटॉर्शनचे रॅकेट’ चालवित असल्याचा धक्कादायक खुलासा यापूर्वी झाला असताना, आता पोलिसांना पप्पू शाहू याचा लॅपटॉप आणि सना खान यांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला

सकाळ डिजिटल टीम

Sana Khan Murder Case: भाजपच्या अल्पसंख्याक सेलची पदाधिकारी सना खानच्या खुनात नवी माहिती समोर आली आहे. सना खानच्या (वय ३४) माध्यमातून पप्पू ऊर्फ अमित शाहू हा ‘सेक्सटॉर्शनचे रॅकेट’ चालवित असल्याचा धक्कादायक खुलासा यापूर्वी झाला असताना, आता पोलिसांना पप्पू शाहू याचा लॅपटॉप आणि सना खान यांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे पप्पूविरोधात ‘सेक्सटॉर्शन’चे महत्त्वाचे पुरावेही हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

सना खान २ ऑगस्टला नागपूर येथून जबलपूरला जाण्यासाठी निघाली होती. त्यानंतर तिचा मोबाइल ‘स्वीच ऑफ’ झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आईसोबत बोलल्यावर तिचा संपर्क तुटला. त्यामुळे मुलीला काही झाले असेल, या भीतीने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यामुळे तपासात सना खानचा खून झाल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, पप्पू शाहू याला पोलिसांनी अटक केल्यावर त्याच्याकडून सनाचा वापर ‘सेक्सटॉर्शन’साठी वापर होत असल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे या रॅकेटच्या माध्यमातून शाहूने मोठी संपत्ती जमवली होती. या संपत्तीतील पैसे सातत्याने सना खान मागत असल्याने तिला कायमचे संपविण्याच्या उद्देशातून त्याने तिचा खून केला. (Latest Marathi News)

या प्रकरणात शाहू याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास म्हणून पोलिसांनी त्याच्या बैलखेडा येथील आशीर्वाद ढाब्याजवळ छापा टाकून त्याचा लॅपटॉप आणि सना खानचा मोबाइल जप्त केला. सध्या पप्पूला प्रॉडक्शन वॉरंटवर कारागृहातून काढून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

अनेकांची कोट्यवधींनी लुबाडणूक?
सना खान आणि पप्पू शाहू यांची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली. वाराणसीला जात असताना दोघांची भेट झाली. तेव्हापासून त्याची आणि सनाची मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्याने या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या व्यक्तींची कोट्यवधींनी लुबाडणूक केल्याचीही माहिती आहे.

विशेष म्हणजे, पप्पूला सनाचे अनेकांसोबत व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली. त्याने ते व्हिडिओ आणि फोटो आपल्याकडे ठेवले. या व्हिडिओमध्ये नागपूरसह उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील काही राजकीय पदाधिकारी आणि बड्या आसामींचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: निधी नसेल तर सिगारेट अन् दारूवर कर लावा, पण... सुनावणीच्या मध्येच सरन्यायाधीश का संतापले?

सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं

Latest Marathi News Live Update : उपोषणामुळे प्रकृती खालावली; सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

FDA: तुकाराम मुंढेंचा प्रहार! बदलापुरात मोठी कारवाई, दोन टपऱ्या सील; भेसळखोरांसह अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

ODI World Cup Format: वर्ल्ड कपच्या नव्या फॉरमॅटला विरोध! ICC विरोधात चार देश उभे राहिले, WCA चे पाठबळ मिळाले; कोणासाठी केला जातोय बदल? थेट सवाल

SCROLL FOR NEXT