Sanjay Raut Ashish Jaiswal MLA No Vote Rajya sabha Election Sanjay Raut Ashish Jaiswal MLA No Vote Rajya sabha Election
महाराष्ट्र बातम्या

"संजय राऊतांना एकही आमदार मतदान करणार नव्हता पण..." - आशिष जयस्वाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जे लोक निवडून येत नाही, ते लोक शिवसेना चालवत आहे. हा आजचा विषय नाही तर २० ते २५ वर्षांपासून सुरू आहे. निवडून आलेल्या आमदारांना पक्ष चालवायला घ्यायला पाहिजे होते. आम्हाला नीलम गोऱ्हे, संजय राऊत, अनिल परब, देसाई यांचा त्रास होता. संजय राऊत (Sanjay Raut) यांना एकही आमदार मतदान करणार नव्हता, असे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले.

आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास झाला. मात्र, आम्ही बेईमानी केली नाही. बेईमानी केली असती तर खासदार संजय राऊत निवडून आले नसते. एकही आमदार (MLA) संजय राऊत यांना मतदान करायला तयार नव्हता. मात्र, आम्ही पक्षाकडे बघून संजय राऊत यांना मतदान केले, असेही आशिष जयस्वाल म्हणाले.

छातीवर दगड ठेवून आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतला होता. कारण, त्रास वाढला होता. शासकीय निवासस्थान वर्षावरून उद्धव ठाकरे निघाले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले होते. आम्हाला असे काही करायचे नव्हते. मात्र, निवडून न आलेल्यांची हिंमत वाढली होती, असेही आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले.

मी २० तारखेलाच निघालो होतो. माझ्यासोबत सात ते आठ आमदार होते. मी जात असल्याचे उद्धव ठाकरे यांना माहीत झाले होते. त्यांनी मला फोन करून विचारले होते कुठे आहे. मी विमानतळावर असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी म्हटले म्हणून परत आलो, असेही आशिष जयस्वाल म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्यांना भाजप नको होती तर कशाला लोकसभेत त्यांच्यासोबत गेले. याचा त्यांनी विचार करावा. नागपुरात आम्हाला कोणती मदत झाली नाही. आम्ही शिवसेना मोठी केली. मात्र, नीलम गोऱ्हे, संजय राऊत (Sanjay Raut), अनिल परब, देसाई यांच्यासारख्या नेत्यांमुळे त्रास वाढला होता. याकडे त्यांचे लक्ष नाही, असेही आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT