गोविंद पानसरे : हत्येचा तपास ATS कडे सोपवा; कुटुंबीयांकडून विनंती अर्ज

Govind Pansare Assign murder investigation to ATS
Govind Pansare Assign murder investigation to ATSGovind Pansare Assign murder investigation to ATS

मुंबई : विचारवंत, भाकपचे ज्येष्ठ नेते व कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवावा, असा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी हा विनंती अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत राज्य सरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडल्या होत्या. २० फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत.

Govind Pansare Assign murder investigation to ATS
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या खाली

न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्हीजी बिष्ट यांच्या पीठापुढे हा अर्ज करण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर, एम. एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे मोठा कट आहे. त्याचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे, असे गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे.

नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरू असल्याने दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देणे अशक्य आहे. मात्र, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे (ATS) देणे शक्य आहे, असेही विनंती अर्जात पानसरे यांच्‍या वकिलांनी म्हटले आहे. दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com