sanjay raut sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

राज्यसभेवर निवडून जाण्यापूर्वी अन् गेल्यावर श्रीरामाचं दर्शन घेणार - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : आमच्यावर कोणत्याही प्रकारचे टेंशन नाही. आम्ही निश्चिंत आहोत. मी स्वतः उमेदवार आहे तसेच सूत्रधार आहे. आमच्यावर कोणते टेंशन तुम्हाला दिसते का? असे उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. राज्यसभेच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर व दाव्यावर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनीधीनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले. चौथ्यांना राज्यसभेवर जाण्याआठी येथे आलो आणि १५ तारखेला राज्यसभेला गेल्यावर श्री रामाचे दर्शन घेणार, असेही संजय राऊत (sanjay raut) म्हणाले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) १५ जून रोजी अयोध्या (ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवासैनिक अयोध्येत जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व एकनाथ शिंदे लखनौ (lucknow) विमानतळावर आले होते. हा शक्तिप्रदर्शाचा कार्यक्रम नाही, तर श्रद्धेचा आहे, असेही संजय राऊत (sanjay raut) म्हणाले.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने तयारी जोरात सुरू आहे. बुधवारी (ता. १५) आदित्य ठाकरे लखनौ येथे पोहोचतील. येथून ते आयोध्येला जातील. यामुळे आम्ही दहा ते बारा लोक तयारीचा आढावा घेण्यासाठी येथे आलो आहोत. पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार होते. आता आदित्य ठाकरे येणार आहेत, असे संजय राऊत (sanjay raut) म्हणाले.

आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील

पत्रकारांनी राज ठाकरे येणार होते, असे संजय राऊतांना विचारले. यावर बोलताना ते म्हणाले, ‘राज ठाकरे येणार होते हे मला माहिती नाही. मी आमच्या पक्षाबद्दल बोलू शकतो. दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल सांगू शकत नाही.’ आमचे कार्यकर्ते काम करीत आहे. कुठे काय सुरू आहे हे पाहण्यासाठी आलो आहोत. टेंशन असतो तर आलो नसतो. आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी (eknath shinde) व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT