bjp mohit kamboj tweet after sanjay raut got out of jail on bail maharashtra News  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : "सावरकर, लोकमान्य टिळकांप्रमाणे मीही जेलमध्ये एकांतात होतो"

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल तब्बल १०३ दिवसांनी जेलमधून जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर आज सकाळी पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले जेलमधले काही अनुभव सांगितले आहेत. तसंच त्यांनी आपण सावरकर, टिळक यांच्याप्रमाणे जेलमध्ये राहिलो असल्याचंही सांगितलं.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपले जेलमधले अनुभव सांगितले आहेत. मला वाटलेलं लोक मला विसरतील, पण कालपासून जे स्वागत पाहतोय, त्यावरुन तसं वाटत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, "लोकांना वाटतं, जेलमध्ये राहतो म्हणजे मजेत राहत असेल. पण जगातलं कोणतंही जेल मजा नसते. जेलमध्ये राहणं फार अवघड आहे.माझी तब्येत जेलमध्येही खराब होती, आत्ताही खराब आहे. तिथे भिंतींशी बोलावं लागतं, एकांतात बोलावं लागतं. मी विचार करायचो की सावरकर १० वर्षांपेक्षा जास्त कसे राहिले असतील, टिळक कसे राहिले असतील, वाजपेयींपासून अनेक लोक कसे राहिले असतील. पण जे राजकारणात असतात, त्यांना कधी ना कधी जेलमध्ये जावंच लागतं. "

यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, "राज ठाकरेंनी एका भाषणात माझ्यावर टीका करताना सांगितलं होतं की आता संजय राऊतांना ईडीकडून अटक होणार. आता राऊतांनी स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस करावी. हो केली मला अटक ईडीने आणि ती बेकायदेशीर होती. आपण शत्रूबद्दलही अशी भावना करू नये. सावरकर, टिळक ज्याप्रमाणे एकांतात होते, त्याप्रमाणे मीही एकांतात होतो. माझी अटक राजकीय होती. मी माझा एकांत सत्कारणी लावला आहे. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT