Sanjay Raut Reaction Income Tax Raid on Yashwant Jadhav e sakal
महाराष्ट्र बातम्या

'BMC मधील...', शिवसेना नेत्यावरील छापेमारीनंतर संजय राऊतांचा खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आज आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raid on Yashwant Jadhav) केली. मुंबई महापालिकेतील (BMC) काही घोटाळ्यासंबंधी ही कारवाई केल्याची माहिती आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे ही छापेमारी केली जातेय, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut Reaction Income Tax Raid on Yashwant Jadhav)

मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे आता तपास यंत्रणा महापालिकेच्या शिपायांवर देखील कारवाई करतील. कारण ते खिशाला धनुष्यबाण लावून फिरतात, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

देशात घाणेरडं राजकारण सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी यावर टीका देखील केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेश प्रचारात झंझावत निर्माण केलं आहे. पण, २०२४ पर्यंत या तपास यंत्रणांना सहन करायचं आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगलला देखील हे सहन करायचं आहे. भाजपची लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का?. दररोज गंगेत स्नान करून पाप करतात. त्यामुळे गंगा मैली झाली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

यशवंत जाधवांवर काय आहेत आरोप? -

आयकर विभागाच्या टीमने आज सकाळीच साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर छापेमारी केली. तसेच त्यांच्या इतर ठिकाणच्या मालमत्तेची देखील चौकशी केली. यशवंत जाधवांवर १५ कोटी घोटाळ्याचा आरोप आहे. हे १५ कोटी रूपये यूएईला हलवल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT