Raj Thackeray Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : "सदू आणि मधू भेटले", CM शिंदे-राज ठाकरे यांच्या भेटीवर संजय राऊत खोचक विधान

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (२६ मार्च) मालेगाव येथे भव्य जाहीर सभा झाली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, "भेट घेतली त्याचं आम्ही काय करणार. सदू आणि मधू भेटले. बालभारतीत आम्हाला एक धडा होता सदू आणि मधू भेटल्याचा. भेटू द्या ना. जुने मित्र असतील ते किंवा नव्याने प्रेम उफाळून आलं असेल कोणाचं. काल मालेगावात जी विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकांचे अश्रू पुसायला गेले असतील" अशा शब्दात खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरेंच्या मालेगाव येथील सभेनंतर एकनाथ शिंदे उत्तर सभा घेणार यावर बोलताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना काहीच काम नाहीये. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नैऋत्य अग्नेय अशा दिशांना सभा घेण्याचा छंद जडला आहे. दुसरं काम काय आहे त्यांना. राज्य कारभार करावं म्हणावं नीट. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढतायत ते समजून घ्या असेही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानभवनाबाहेरील भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला लोकसभेच्या लॉबीत मोदी रोज भेटतात, अमित शहा जेपी नड्डा भेटतात, याचा अर्थ काय घ्याल. उद्या फडणवीस याच्या जागी दुसरं कोणी मुख्यमंत्री झालं तरी रस्ता तोच आहे. विरोधकांना वेगळा आणि राज्यकर्त्यांसाठी वेगळा रस्ता असं तरी अजून काही नाही असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT