Sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार व खरगे यांची महत्त्वाची बैठक, राष्ट्रपती निवडणुकीवर खलबते

सोनिया गांधींचा निरोप घेऊन खरगे यांनी पवारांशी चर्चा केली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने आज गुरुवारी (ता.नऊ) राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) व काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या दरम्यान राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा झाली. (Sharad Pawar And Malikarjun Kharge Discussion On Presidential Election In Meeting)

राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी चर्चा झाली. सोनिया गांधींचा निरोप घेऊन खरगे यांनी पवारांशी चर्चा केली. सर्व पक्षांची बैठक घेऊन एक उमेदवार निवडण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे , टीएमसी, समाजवादी पक्ष या सर्वांसोबत बोलायला सांगितले. वेळ आणि दिवस ठरवून तारीख घेऊ आणि बैठक घेऊ, असे खरगे म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी समविचारी लोकांनी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. १० आणि १९ तारीख आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Kolhapur Municipal Corporation: विरोधी पक्षनेता निवडीदरम्यान काँग्रेसचे अनिल रावळ यांना हार्ट अटॅक; कोल्हापूर महानगरपालिकेत दुर्दैवी घटना

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

SCROLL FOR NEXT