Photo: राज्यसभा निवडणुकीआधीच टेस्ट निगेटिव्ह; फडणवीस अॅक्टिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यसभा निवडणुकीआधीच टेस्ट निगेटिव्ह; फडणवीस अॅक्टिव्ह

Devendra Fadnavis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची चाचणी आज निगेटिव्ह आली असून राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आज आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने चर्चा होत आहे.

उद्या राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार असून आज देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.

भाजपाने राज्यसभेसाठी तीन उमेदवार उभे केले असून त्यामध्ये धनंजय महाडिक आणि संजय उपाध्याय यांचा सामावेश आहे.

दरम्यान रवी राणा यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून भाजपाला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात दीड तास चर्चा केल्याचं राणा यांनी सांगितलं आहे.

राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार, प्रविण दरेकर, गिरीष महाजन, आणि केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे.

राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसणार असल्याची चर्चा फडणवीसांशी केल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच अपक्ष आमदार मोठा भूकंप करणार असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे.

go to top