Sharad Pawar Resigns Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : 'राजीनामा मागे घ्या' म्हणत NCP कार्यकर्त्याचा रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपादाचा राजीमाना मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीकडून शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.

"देशातील सध्याच्या राजकारणात सक्षम विरोधी पक्षाची गरज असून त्यासाठी शरद पवार हे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही" असं आत्मदहन करणाऱ्या कार्यकर्त्यानी म्हटलं आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर समिती अध्यक्षपदाच्या घोषणेवर काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या व्यतिरिक्त सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार राहणार की दुसऱ्या कुणाचे नाव पुढे येणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT